इंडोनेशियात त्यानं शेकडोंचा जीव वाचवला पण, तो जिवानिशी गेला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इंडोनेशिया भूकंप : त्यानं शेकडोंचा जीव वाचवला पण, तो वाचू शकला नाही

इंडोनेशियात भूकंपावेळी अँथोनिअस अॅगाँग या एअर ट्राफिक कंट्रोलरनं एका विमानातल्या अनेकांचे जीव वाचवले. पण, त्यानंतर त्याचा मात्र जीव गेला.

पालू एअरपोर्टवर भूकंपानं थैमान घातलं. इमारतीचा काही भाग कोसळला. ज्यावेळी भूकंपाचे धक्के जाणवू लागले तेव्हा विमान टेक ऑफ करण्याच्या तयारीत होतं.

पण, विमानाचं सुखरुप टेक ऑफ झाल्यावरच या ट्राफिक कंट्रोलरनं आपली जागा सोडली. त्यामुळे विमान सुखरुप आकाशात गेलं. पण, भूकंपाच्या धक्क्यानं इमारत कोसळली आणि तो आपला जीव वाचवू शकला नाही.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)