जंगलातल्या या आजी लिलया सापाचं विष उतरवतात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

75 वर्षांच्या या आजींना माहिती आहेत जंगलातल्या सर्व औषधी वनस्पती

केरळच्या तिरुवनंतरपूरम इथल्या कोल्लार जंगलातल्या लक्ष्मी कुट्टी या 75 वर्षांच्या आजी सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे औषधी वनस्पतींचं अफाट ज्ञान आहे.

विषबाधा आणि सर्पदंश झाल्यावर औषधोपचार घेण्यासाठी लोक लांबून त्यांच्याकडे येतात. त्यांना केरळ राज्य सरकारनं धन्वंतरींची मूर्ती भेट देऊन गौरव केला आहे.

त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून त्या कोणत्याही प्रकराचं विष उतरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना हे ज्ञान निसर्गातूनच मिळाल्याचं कुट्टी सांगतात.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)