रोहिंग्या मुस्लिमांसाठी समुद्रातलं एक बेट सज्ज होत आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : बंगालच्या उपसागरातल्या एका बेटावर होणार रोहिंग्या मुस्लिमांचं पुनर्वसन

बांगलादेश सरकारनं एक लाख रोहिंग्या निर्वासितांचं पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. त्यांना कायमस्वरुपी जागा मिळावी म्हणून वसाहत बांधण्याचं काम भाषणचार या बेटावर सुरु आहे.

सध्या म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या कॉक्सेस बाजारमध्ये हे निर्वासित राहत आहेत.

अगदी निर्मनुष्य असणारं भाषणचार बेट मानवी वसाहतीसाठी नव्यानं उभं राहत आहे. मात्र, गेले अनेक दिवस कॉक्सेस बाजारमध्ये वास्तव्य केल्यामुळे एका निर्मनुष्य बेटावर जाऊन का राहावं? हा प्रश्न रोहिंग्या मुस्लिमांना सतावत आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये यांचा रिपोर्ट. शूटिं आणि एडिटिंग - संजय गांगुली

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)