भारतीय महिला आणि आफ्रिकी पुरुषाची प्रेमकथा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : भारतीय महिला आणि आफ्रिकी पुरुषाची प्रेमकथा

एलेन आणि सिमो यांची प्रेमकहाणी अगदी खास आहे. एलेन भारतीय हिंदू आहे तर सिमो झुलू आफ्रिकन आहे. त्यांना 3 मुलं आहेत.

1985पर्यंत दक्षिण आफ्रिकेत आंतरवंशीय लग्नांवर बंदी होती. ही बंदी उठल्यानंतर 2 दशकांनी एलेन आणि सिमो यांनी लग्नाचा घेतलेला निर्णय हा धाडसीच होता.

एलेननं कृष्णवर्णियाशी लग्न केल्यानं तिच्यावर टीका झाली. तिची आई देखील नाराज झाली होती.

आता या दोघांच्या लग्नाला 12 वर्ष झाली असून त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी झुबेर अहमद यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडीट - नेहा शर्मा

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)