जपानमध्ये ऑलिंपिक स्पर्धांसाठी मच्छी मार्केट होणार नष्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हे 83 वर्षं जुनं मच्छी मार्केट 2020 ऑलिंपिकसाठी नष्ट होणार - व्हीडिओ

जपानची राजधानी टोकियोमधलं चकिझी मच्छी मार्केट 2020 साली होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी पाडला जाणार आहे.

1935मध्ये उभा राहिलेला हा बाजार 83 वर्षं जुना आहे. या मच्छी मार्केटमधल्या विक्रेत्यांना नव्या सुसज्ज मासळी बाजारात हलवलं जाणार आहे. याला इथल्या 83 टक्के मच्छी विक्रेत्यांचा विरोध आहे. टोक्योमध्ये येणारे पर्यटक या मार्केटला आवर्जून भेट देतात. पण आता हे मार्केट कालबाह्य होणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)