सौदीचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्यासोबत नेमकं काय झालं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : पत्रकार जमाल खाशोगी यांच्यासोबत नेमकं काय झालं?

सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी कामानिमित्त तुर्कीमधल्या सौदीच्या दूतावासात गेले खरे, पण अजून बाहेर आलेले नाहीत. ते नाट्यमयरित्या गायब झाले आहेत.

इस्तंबूलमधल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात शिरताना जमाल खाशोगी शिरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात. मात्र, त्यानंतर ते बाहेर पडले नाहीत.

या दूतावासाबाहेर त्यांच्या होणाऱ्या पत्नी त्यांची वाट पाहत होत्या. या दूतावासातच त्यांची हत्या झाल्याचा आरोप तुर्की सरकारने केला आहे.

या प्रकरणी सत्य काय आहे याचा आम्ही शोध घेऊ असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)