चिंपाझी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बीबीसी रिपोर्टमधून धडा घेत नेपाळ पोलिसांनी केला चिंपांझी तस्करीचा पर्दाफाश

आफ्रिकेतल्या चिंपाझींच्या पिल्लांना भारतात पाळीव प्राणी म्हणून खूप मागणी आहे. त्यामुळे त्यांची नेपाळमार्गे भारतात तस्करी केली जाते.

2017 मध्ये बीबीसीने केलेल्या एका शोधपत्रकारितेतून ही बाब उघड केली होती. मग नेपाळ पोलिसांनी त्यातून धडा घेतला आणि त्यांना या तस्करांना रंगेहाथ पकडण्यात यश आलं.

नेपाळच्या पोलिसांना या तस्करीची खबर मिळाल्यावर त्यांनी काठमांडू विमानतळावर कडक नजर ठेवली. आधी पक्षांच्या पिंजऱ्यासारख्या वाटणाऱ्या काही खोक्यांमधून अवघ्या काही महिन्यांचे चिंपांझीचे पिल्लू त्यांना सापडले.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)