पाहा व्हीडिओ : 'चक्रीवादळामुळे पतीनं आत्महत्या केली होती, आता मी विष घेऊ का?'

पाहा व्हीडिओ : 'चक्रीवादळामुळे पतीनं आत्महत्या केली होती, आता मी विष घेऊ का?'

तितली चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशमधल्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. याचा सर्वाधिक फटका इथल्या महिला शेतकऱ्यांना बसला आहे. या वादळात नारळाच्या बागा उध्वस्त झाल्या.

नारळाची झाडं पुन्हा उभी राहायला १० वर्षांहून अधिक काळ लागणार असल्याने या महिलांना पुढच्या उत्पन्नाची इच्छा सतावते आहे.

कलावती या महिलेच्या पतीनं 22 वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळानंतर खूप नुकसान झाल्यानं आत्महत्या केली होती.

आता पुन्हा नुकसान झाल्यानं मी सुद्धा विष घेऊन आत्महत्या करायची का? असा सवाल कलावतीनं उपस्थित केला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)