पाहा व्हीडिओ - पप्पा सांगा कोणाचे? पप्पा या बदकांचे!

मायकेल यांनी 2015मध्ये सात बदकांच्या संगोपनाचा विडा उचलला आणि मग त्या बदकांनी मायकेल यांची पाठ सोडली नाही.

2015मध्ये जर्मनीच्या मायकेल यांनी नवजात सात बदकांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. ते अगदी त्यांचे मायबापच झाले. असा निर्णय घेतल्यावर मित्रांनी त्यांची थट्टा उडवली. पण काही दिवसांनंतर त्यांच्या प्रयत्नांची फळं दिसू लागली.

मायकेल यांनी बदकांची भाषा शिकावी लागली. बी-बी-बी असा आवाज काढून ते बदकांना झोपवतात तर गा-गा-गा असा आवाज काढून त्यांना धोक्याची सुचना करतात.

भेटा तर मग बदकांच्या पप्पांना!

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)