व्हीडिओ : जुळ्यांचं गाव जिथे प्रत्येक घरात आहेत 'राम और शाम', 'सीता और गीता'

व्हीडिओ : जुळ्यांचं गाव जिथे प्रत्येक घरात आहेत 'राम और शाम', 'सीता और गीता'

नायजेरियाच्या इबो-ओरा या गावात बहुतांशी मुलं जुळी आहेत. काही घरांमध्ये तर पालकसुद्धा जुळे आहेत.

"आमच्या घरात जुळ्यांच्या तीन जोड्या आहेत. माझे पालकसुद्धा जुळे आहेत," असं इथला एक मुलगा सांगतो.

हा वेगळा गुण साजरा करण्यासाठी यंदा इथल्या सरकारनं एका महोत्सवाचं आयोजन केलं होतं. जुळ्यांना सर्वत्र आदर दिला जातो, जुळ्यांसाठी हे खासच आहे, असंही काही जणांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)