कोण पसरवतं सोशल मीडियावर फेक न्यूज? आणि का? पाहा हा व्हीडिओ

कोण पसरवतं सोशल मीडियावर फेक न्यूज? आणि का? पाहा हा व्हीडिओ

भारतात सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे दहशतीचं वातावरण पसरवलं जात असल्याचे अनेक किस्से समोर आले आहेत. अनेकदा या प्रकरणांमध्ये सामूहिक हिंसेच्या घटना घडतात आणि निष्पाप लोकांचा जीव जातो.

ही चुकीची माहीती, या अफवा पसरवण्याचं काम काही फेसबुक पेजेस आणि वेबसाईट्स करत असल्याचा आरोप होतो.

एखाद्या अपुऱ्या किंवा खोट्या माहितीचा फेसबुकवरून किंवा वेबसाईटवरून प्रचार करून लोकांची दिशाभूल करण्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, अशांची बीबीसीच्या प्रतिनिधीनं भेट घेतली.

त्यांच्या फेसबुक पेज किंवा वेबसाईटवरील खोट्या माहितीची त्यांना जाणीव करून देण्यात आली. यावर काहींनी ती फेक न्यूज असल्याचं मान्य केलं तर काहींनी त्या माहितीला फेकन्यूज मानण्यास नकार दिला.

बीबीसीच्या #BeyondFakeNews अभियानाअंतर्गत पाहा बीबीसी प्रतिनिधी विनित खरे यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडीट - पियुष नागपाल

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)