सरदार पटेलांचा पुतळा झाला, पण शेतकऱ्यांचे घसे मात्र कोरडेच

सरदार पटेलांचा पुतळा झाला, पण शेतकऱ्यांचे घसे मात्र कोरडेच

सरदार पटेलांच्या नर्मदेच्या काठावर बांधलेल्या पुतळ्यावर 3000 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पण, याच नदी काठावरच्या गावांच्या घशांना कोरड पडली आहे.

अशी भावना इथून १२ किलोमीटर दूर असलेल्या नाना पिपडीया गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना पाण्याचा पुरवठा व्यवस्थित करू असं अश्वासन काही वर्षांपूर्वी तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. पण, पाण्याचा पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही.

बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडीट - पवन जयस्वाल

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)