व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्याआधी काय काळजी घ्याल?

व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्याआधी काय काळजी घ्याल?

तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर मिळणाऱ्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जर एखाद्या पोस्टमध्ये काहीतरी गडबड वाटली तर ती खरी आहे की खोटी हे तपासायला पाहिजे.

सोशल मीडियावर सध्या भारतीय भाषांमध्ये संवाद साधणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण भारतात स्वतंत्रपणे fact-checking करणाऱ्या बहुतांश संस्था इंग्रजीतच काम करतात. altnews सारख्या वेबसाईट्सनी हिंदीतही हे काम सुरू केलं आहे. तर youturn.in सारखं पेज तमिळमध्ये फेक न्यूजशी दोन हात करतं. पण भारतीय भाषांमध्ये विशेषतः मराठीत असे स्वतंत्र प्रयोग सुरू झालेले नाहीत.

त्यामुळेच फेक न्यूजशी लढणं ही फक्त पत्रकारच नाही तर आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

व्हीडिओ निर्मिती - शरद बढे आणि जान्हवी मुळे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)