फेक न्यूजच्या विरोधात तेलंगणा पोलिसांनी घेतलाय गाण्यांचा आधार

फेक न्यूजच्या विरोधात तेलंगणा पोलिसांनी घेतलाय गाण्यांचा आधार

तेलंगणामध्ये पोलिसांनी फेक न्यूजचा सामना करण्यासाठी एक खास गट स्थापन केला आहे. गावोगावी जाऊन गाणी आणि पथनाट्याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका असं आवाहन ते करतात. तेलंगणा पोलिसांच्या या उपक्रमाला लोकांकडून प्रतिसादही मिळत आहे. अफवा कानावर आल्यास ती आधी पोलिसांना कळवू असं इथल्या नागण्णा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

बीबीसीच्या #BeyondFakeNews अभियानाअंतर्गत पाहा बीबीसी तेलुगूच्या प्रतिनिधी दिप्ती बत्तिनी यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडीट - नविन

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)