आसाममध्ये अफवांचे बळी ठरले दोन निष्पाप तरुण

आसाममध्ये अफवांचे बळी ठरले दोन निष्पाप तरुण

आसाममध्ये मुलं पकडणारे आले अशी अफवा पसरली आणि त्यात निलोत्प आणि अभिजीत या दोन युवकांचा बळी गेला. स्मार्टफोन आल्यामुळे या अफवा सोशल मीडियामार्फत वेगाने पसरत आहेत. या प्रकरणी 40 जणांवर गुन्हाही दाखल झाला. परंतु, आजही खोट्या बातमीचा प्रसार होऊन अनेकांचा जीव जात आहे. याचा निर्णय जमावच करत असल्याने अनेकांना जबर मारहाण करून मारून टाकलं जात आहे. आसाममध्येही असंच घडलं. या रिपोर्टमधली दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात.

आसाममध्ये मुलाचं अपहरण करणारी टोळी आली आहे, अशी अफवा पसरली होती. सोशल मीडियामुळे ही अफवा आगीसारखी पसरली आणि या अफवांनी नीलोत्पल आणि अभिजीत या दोन युवकांचा बळी घेतला. या प्रकरणी 40 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे.

अशा घटना इतर ठिकाणीही घडलेल्या आहेत. जमाव स्वतःच कायदा हाती घेत असल्याचं हे चित्र बऱ्याच प्रकरणांत दिसलं आहे.

इशारा :या रिपोर्टमधली दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात.

बीबीसीच्या #BeyondFakeNewsअभियानाअंतर्गत बीबीसी प्रतिनिधीवरुण नायर आणि कुणाल सेहगल यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)