इराणवरच्या निर्बंधांमुळे भारतात पेट्रोल दर वाढण्याची भीती

इराणवर अमेरिकेनं लावलेल्या निर्बंधांमुळे इंधन खरेदीत अडचणी येणार आहेत. त्यामुळे भारतासाठी येणारा काळ कठीण असेल असं म्हटलं जातं आहे.

भारतीय उद्योग आणि ऑईल मार्केटिंग कंपन्या दररोज इराणकडून 5 लाख 23 हजार बॅरेल इंधनाचं तेल खरेदी करतात. म्हणजे भारताच्या एकूण तेलाच्या गरजेपेक्षा 10 टक्के तेल हे इराणकडून आयात केलं जातं.

मात्र, अमेरिकेने इराणवर लावलेल्या निर्बंधांचा फटका या तेल आयातीला बसू शकतो. त्यामुळे भारतात पेट्रोल दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी देविना गुप्ता यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)