रफाल करार : संरक्षण मंत्री निर्मला सितारामन पाहा काय म्हणाल्या

बीबीसीला दिलेल्या Exclusive मुलाखतीत संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी रफाल कराराच्या मुद्द्यावर त्यांची स्पष्ट मतं मांडली आहेत.

रफाल विमानांच्या किमतीबाबत निर्मला यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संसदेत डिसेंबर 2016मध्ये त्यांनी सादर केलेले विमानांचे आकडेच योग्य असल्याचं म्हटलंय. तसंच, राहुल गांधी यांनी रफाल विमानांच्या पाच वेगवेगळ्या किंमती सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला.

बीबीसीचे प्रतिनिधी झुबेर अहमद यांनी ही विशेष मुलाखत घेतली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)