आता विमानतळावर तुमचं स्वागत करणार रोबो
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आता रोबो करणार विमानतळावर तुमचं स्वागत

विमानतळावर प्रवाशांना मदत करण्यासाठी काही दिवसांनी रोबो अवतरण्याची शक्यता आहे. 'राडा' या रोबोसह एअर विस्तारानं नुकताच एक प्रयोग केला.

या रोबोनं लोकांना बोर्डिंग पास तपासून देणं, प्रवाशांना त्यांच्या विमानाची माहिती देणं, त्यांना मनोरंजनासाठी गाणी आणि व्हीडिओ दाखवणं यांसारखी काम केली.

प्रायोगिक पातळीवर 'राडा'चा वापर झाला असला तरी हवाई वाहतूक क्षेत्रात रोबोंचा वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीबीसी प्रतिनिधी सिद्धनाथ गानू यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडिट - देबाशिष कुमार

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)