चीनमध्ये उईघर मुस्लिमांना का कोंडल जात आहे?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

चीनने 10 लाख विगर मुस्लिमांना कँपमध्ये डांबलंय?

चीनमधल्या शेंझेन प्रांतात विगर मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली कँपमध्ये ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. या कँपच्या परिसरात जायला सामान्य नागरिक आणि माध्यमांना मज्जाव आहे. इथलं चित्रीकरण करण्यासही पोलीस मनाई करतात. मात्र, या कँपच्या आत मोठ्या प्रमाणात मुस्लीम नागरिकांना ठेवलं गेलं आहे. या मुस्लिमांना कट्टरतावादापासून दूर राहण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. मात्र, इथे लोकांना कोंडलं नसून त्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा दावा चीननं केला आहे. अशा कँपची संख्या हळूहळू वाढते आहे.

बीबीसी चीनचे प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)