काश्मीरातल्या बर्फवृष्टीत 50 कोटींची सफरचंद गोठली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काश्मीरातल्या बर्फवृष्टीत 50 कोटींची सफरचंद गोठली

काश्मीरात झालेल्या पहिल्या बर्फवृष्टीचा इथल्या सफरचंदाच्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. जवळपास 25 लाख शेतकऱ्यांचं 50 कोटींहून अधिकचं नुकसान झालं आहे.

या बर्फवृष्टीमुळे केवळ सफरचंदच खराब झाली नसून झाडंही तुटली आहेत. ही झाडं पुन्हा उभी रहायाला किमान 10 वर्षं लागतील, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

तसंच, बर्फवृष्टीचा हंगाम सुरू व्हायच्या आधीच बर्फवृष्टी झाल्याने झाडावर आकाराला आलेली सफरचंदही खराब झाली आहेत.

इथल्या काही शेतकऱ्यांचं 20 टक्के तर काहींचं 50 टक्के नुकसान झालं आहे.

बीबीसीचे जम्मू आणि काश्मीर प्रतिनिधी आमिर पिरझादा याचा रिपोर्ट.

शूट आणि एडीटसुद्धा आमिर पिरझादा यांनी केलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)