दिल्लीत वायू प्रदूषण वाढलं आणि त्याबरोबर सरंक्षक मास्कचा धंदाही

दिल्लीत वायू प्रदूषण वाढलं आणि त्याबरोबर सरंक्षक मास्कचा धंदाही

दिल्लीमधलं वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या पलीकडे गेलं आहे. त्यामुळे बाहेर वावरताना तोंडावर मास्क लावणंही अनिवार्य झालं आहे. यामुळे हा मास्कचा धंदा तेजीत आला आहे.

दिल्लीत या मास्कची मागणी 500 टक्क्यांनी वाढली आहे. यासाठी काही कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मास्क तयार करण्यास सुरुवात केली आहे.

यातील एका मास्कची किंमत तर साडेतीन हजार रुपयांच्या वर गेली आहे. तर, केवळ नाकपुड्यांवर बसणारे नेझल मास्कही बाजारात उपलब्ध आहेत. या मास्कने फायदा किती होतो याबद्दल तज्ञांमध्येही दुमत आहे. पण दिल्लीतल्या वाईट हवेत या मास्कने लोकांना आधार मिळतो आहे.

बीबीसीच्या व्यापार प्रतिनिधी देविना गुप्ता यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)