मोबाईल अॅपद्वारे आरोग्यसुधार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ग्रामीण भागात लोकांना तंदुरुस्त ठेवणारं मोबाईल अॅप

केनियाच्या ग्रामीण भागात एक मोबाईल अॅप आरोग्यसेविकांसाठी वरदान ठरलं आहे.

या अॅपद्वारे रुग्णांची सगळी माहिती डिजिटल पद्धतीने साठवली जाते. या माहितीच्या आधारे रुग्णांना उपचारासंदर्भात सल्ला दिला जातो.

पूर्वी आरोग्यसेविका ही सगळी माहिती कागदोपत्री ठेवत असत. मात्र मोबाईल अॅपमुळे त्यांचं काम सोपं झालं आहे.

दुर्गम भागातल्या गरोदर स्त्रियांची माहिती तसंच नवजात बाळांच्या तब्येतीबाबत तपशीलवार नोंदी ठेवणं आता सोपं झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)