गुडघेदुखी थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

गुडघेदुखी थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे?

गुडघ्यांचं दुखणं एवढं वाढतं की लोकांना रोजची कामं करणं अवघड जातं. ही गुडघेदुखी का उद्भवते आणि ती कशी रोखता येईल?

मांडीचं आणि पायाचं हाडं एकमेकांना घासू नयेत अशी रचना निसर्गाने केली आहे. यांमध्ये दोन गाद्या असतात. त्या आपल्या शरीराचं वजन पेलतात. गाडी चालवताना धक्के बसू नये यासाठी मोटारसायकलचं शॉक ऑब्झर्व्हर असतात, तसंच यांचं काम चालतं. त्या व्यतिरिक्त यामध्ये 1 सेंटीमीटर जाड कार्टिलेजचा थर असतो. वयोमानाने हा थर झिजतो त्यामुळे हाडं एकमेकांना घासली जातात.

तंदुरुस्त गुडघ्यांसाठी काय काळजी घ्यावी?

  • गुडघ्यांच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला आधी फिटनेसकडे लक्ष द्यावं लागेल.
  • गुडघ्यांवर अतिरिक्त भार पडला तर ते लवकर निकामी व्हायची शक्यता असते.
  • वजन आटोक्यात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसंच गुडघ्यांचा व्यायाम करणंही महत्त्वाचं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)