हात नव्हते म्हणून त्या पायाच्या अंगठ्याने शिवणकाम करायला शिकल्या
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हात नव्हते म्हणून त्या पायाच्या अंगठ्याने शिवणकाम शिकल्या

बांगलादेशातील बानू अक्तर यांना जन्मत:च दोन्ही हात नाहीत. अनेक संघर्षांना तोंड देत आता त्या कुशल कारागीर झाल्या आहेत.

लहानपणी आईवडिलांनी त्यांना ना चालायला शिकवलं, ना शाळेत घातलं. पण त्या स्वत:हून चालायला शिकल्या. गावात कुणी काळजी घेणार नव्हतं म्हणून त्यांनी सरळ ढाका गाठलं. त्याठिकाणी बानू कपडे शिवायला शिकल्या. तसंच त्या कलाकुसरीच्या वस्तू बनवायलाही शिकल्या. आता त्या सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)