BBC Exclusive : मंदिर ही काय फक्त भाजपची मक्तेदारी आहे का? - ज्योतिरादित्य सिंधिया
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मध्य प्रदेश: मंदिर ही काय फक्त भाजपची मक्तेदारी आहे का? - ज्योतिरादित्य सिंधिया

"हिंदू धर्म आणि मंदिरं ही काय भाजपाची मक्तेदारी आहे का?"

"जसे तुम्ही हिंदू आहात तसा मी पण हिंदू आहे. भाजप मंदिरांबद्दल बोलतं ते चालतं आणि आम्ही जर गोशाळेबद्दल बोलायला लागलो तर त्याची कोणाला अडचण का असावी?" असं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशातले खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं. बीबीसीला दिलेल्या एक्सक्लुजिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

काँग्रेस या मध्य प्रदेश निवडणूकीत सॉफ्ट हिंदुत्वाचं कार्ड खेळत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना सिंधिया यांनी वरील विधान केलं. यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सिंधिया यांनी बीबीसीशी संवाद साधला.

सिंधियांची विशेष मुलाखत बीबीसी मराठीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी घेतली आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)