'त्वचेच्या रंगामुळे आम्हाला नोकरी मिळत नाही'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दक्षिण आफ्रिकेत: 'त्वचेच्या रंगामुळे आम्हाला नोकरी मिळत नाही'

दक्षिण आफ्रिकेत सध्या मिश्रवर्णीय तरुण रस्त्यावर उतरले आहेत. कमी होत जाणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि न मिळणारे हक्क, अधिकार याविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

रोजगाराचे भीषण प्रश्न सध्या इथल्या जोहान्सबर्गच्या काही भागात निर्माण झाले आहेत. याचबरोबर तरुणाईला अंमली पदार्थांचा विळखाही पडला आहे. त्वचेचा रंग बघून नोकरी दिली जाते. मिश्रवर्णीय तरुणांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत, असं ल्युथर नावाच्या तरुणानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)