मध्यप्रदेश निवडणूक : कोण आहेत हे 'कम्प्युटर बाबा'?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मध्य प्रदेश : कम्प्युटर बाबा ठरणार शिवराज सिंह चौहान सरकारसाठी डोकेदुखी?

शिवराज सरकारने काही साधूंना आणि बाबांना राज्यमंत्रापदाचा दर्जा दिला तेव्हा बराच गहजब झाला होता. त्यातल्या काहींनी नंतर राजीनामा सुद्धा दिला. त्यातलेच एक म्हणजे कंप्युटर बाबा.

या कंप्युटर बाबांनी साधूंची एक नर्मदा परिषद आज आयोजित केली आहे. राजकीय निरीक्षक म्हणतात की त्यांची पावलं काँग्रेसकडे वळत आहेत. मध्यप्रदेशमध्ये या आठवड्याच्या अखेरीस मतदान होणार आहे.

त्यानिमित्ताने बीबीसी न्यूज मराठीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी त्यांच्याशी या सगळ्याबद्दल मध्यप्रदेशात जाऊन केलेली थेट बातचीत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)