इस्रायलमधील थाय कामगारांच्या व्यथा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इस्रायलमधली थायलंडच्या कामगारांच्या व्यथा : 'माझा नवरा कसा मेला हे कळलंच नाही'

थायलंडचे बरेच कामगार इस्रायलमध्ये शेतीत काम करतात. या कामगारांच्या दयनीय स्थितीबद्दलचा बीबीसीचा हा रिपोर्ट.

2012मध्ये थायलंड आणि इस्रायलमध्ये शेतीविषयक उपक्रम सुरू झाला. या उपक्रमात थायलंडमधील सुमारे 25,000 कामगार इस्रायलमध्ये काम करतात.

बीबीसी थायलंड टीमने टीमने इस्रायलमधील या कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या. यापैकी अनेक ठिकाणं अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. या मजुरांना खूप काम करावं लागतं आणि त्याचा योग्य मोबदलाही मिळत नाही. काम जाईल या भीतीनं हे मजूर उघडपणे बोलायला घाबरतात.

इस्रायलच्या कायद्याअंतर्गत थायलंडच्या या कामगारांचे हक्क संरक्षित आहेत. पण अन्न, निवारा आणि व्हिसासाठी ते इथल्या शेतकऱ्यांवर अवलंबून आहेत.

2013पासून वेतन आणि कामाच्या वेळासंबंधीच्या 15,000 तक्रारी आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती इस्रायलच्या कामगार मंत्रालयाने दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)