तुम्ही दिर्घायुषी होताय पण तुम्हाला या आजारांचा धोकाही वाढतोय
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तुमचं आयुष्य तर वाढलंय पण या आजारांचा धोकाही वाढलाय

माणसाचं आयुष्य पूर्वीपेक्षा वाढलं आहे.

2050पर्यंत जगातील 2.1 अब्ज लोकांनी साठी पार केलेली असेल. पण 2030पर्यंत 8 कोटी 50 लाख लोक स्मृतिभ्रंशाने ग्रस्त असतील. तसंच त्यांना इतरही आजारांना तोंड द्यावं लागेल.

दरवर्षी 8 कोटी 30लाख लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता आहे आणि 2040पर्यंत 64.2 कोटी लोकांना डायबेटीस होऊ शकतो.

येत्या काळात जगभरात आरोग्यावर होणाऱ्या खर्चात 5.4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. पण, वाढत्या गरजा भागवण्यासाठी हे पुरेसं आहे का?

जगात 2030पर्यंत 8 कोटी डॉक्टर आणि नर्सेसची गरज लागेल. येणाऱ्या काळात 1 कोटी 50 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासेल.

या विषयावर सध्या अनेक स्टार्टअप्स काम करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)