26/11चा मुंबई हल्ला होत असताना या चिमुकलीचा जन्म झाला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

26/11चा हल्ला होत असताना या चिमुकलीचा झाला जन्म

26/11च्या मुंबई हल्ल्यात कामा हॉस्पिटलमध्ये गोलीचा जन्म झाला. या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला. या दिवसाचं स्मरण म्हणून तिचं नाव गोली ठेवण्यात आलं आहे.

"डॉक्टर माझी तपासणी करत होते, तेवढ्यात गोळ्यांचा आवाज यायला लागला. डॉक्टरांना फोन आला आणि ते बाहेर गेले. त्यानंतर बाहेरचे कर्मचारी धावत माझ्या रूमकडे आले आणि काही वेळात गोलीचा जन्म झाला," तिच्या आई विजू चव्हाण सांगतात.

चव्हाण कुटुंबीयांसाठी हा दिवस आनंद आणि दुःख दोन्ही घेऊन येतो.

"त्या दिवशी आम्हाला मुलगी झाल्याचा आनंद आहेच पण दुसरीकडे या हल्ल्यांत अनेकांची घरं उद्धवस्त झाली याचं दुःखही आहे. म्हणून आम्ही मुलीचा वाढदिवस साजरा करत नाही. या दिवशी आम्ही हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो," असं गोलीचे वडील शामू चव्हाण सांगतात.

मुंबईतील या हल्ल्यात एकूण 166 जणांचा बळी गेला होता.

गोलीने भविष्यात देशसेवा करावी, असं विजू यांना वाटतं.

विजू चव्हाण सागंतात, "मी गरीब आहे. मी मुलीला जास्त शिकवू शकत नाही. जेवढं शक्य असेल तेवढं मी तिला शिकवेन. गोलीने सैन्यात किंवा पोलिसांत भरती होऊन देशाची सेवा करावी, असं मला वाटतं. कारण ती माझीच नाही तर या देशाची मुलगी आहे."

व्हीडिओ शूट आणि एडिट - राहूल रणसुभे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)