किसान मुक्ती मार्च : ‘मागण्या मान्य होईपर्यंत संसद सोडणार नाही’
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

किसान मुक्ती मार्च : ‘मागण्या मान्य होईपर्यंत दिल्ली सोडणार नाही’

देशभरातल्या 200 संघटनांनी एकत्र येत दिल्लीमध्ये ‘किसान मुक्ती मार्च’चं आयोजन केलं आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या संगीता भोईर शेतकरी मोर्चात सामील होण्यासाठी पाचव्यांदा दिल्लीत आल्या आहेत. शेतकरी संगीता यांची सरकारकडे एकच मागणी आहे.

संगीता नाशिक ते मुंबई या लाँग मार्चमध्येही सहभागी झाल्या होत्या.

लाँग मार्चविषयी विचारल्यावर त्या सांगतात, "मुंबईला आमच्या पायाला फोडं आले चालून चालून. सरकार म्हणे देऊ जमीन तुमच्या नावानं करून, देऊ तुम्हाला सातबारा. त्यासाठी 3 महिन्याची बोली केली सरकारनं पण परत काही त्यांनी आमच्याकडे पाहिलं नाही."

संगीता यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या मार्चमध्ये सहभागी झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)