बाँबे रक्तगट तुम्हाला माहित आहे का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बाँबे रक्तगटाविषयी तुम्ही ऐकलंय का? पाहा हा व्हीडिओ

'बाँबे' रक्तगट हा एक दुर्मिळ रक्तगट आहे. भारतात दर 10 हजार लोकांमागे एकाचा बाँबे रक्तगट आहे.

सामान्य चाचणीने हा रक्तगट ओळखता येत नाही. हा दुर्मिळ असल्याने तो अधिक काळ सुरक्षित ठेवावा लागतो आणि या गटाचं रक्त अत्यंत कमी तापमानात ठेवावं लागतं.

बाँबे रक्तगट रक्तगटाचा शोध मुंबईमध्ये लागला. या रक्तगटाचे सर्वाधिक लोक मुंबईत आहेत.

'बाँबे' रक्तगटामध्ये निगेटीव्ह आणि पॉझिटिव्ह असे प्रकार असतात.

तुमाचाही रक्तगट बाँबे असेल तर तुमची नोंद Central Blood Registryमध्ये करा. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्यासारख्या इतरांनाही पुरेशी मदत मिळू शकेल.

हे अनुवांशिक असल्याने तुमच्या नातेवाईकांची रक्तगट चाचणी करून घ्या. त्यांचाही बाँबे रक्तगट असू शकतो.

अधिक माहितीसाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)