बुरुंडीच्या राष्ट्राध्यक्षांनी विरोधकांना संपवायला 'उभारल्या छळछावण्या'

बुरुंडी देशात राष्ट्राध्यक्ष एनकुरुनझिझा तिसऱ्यांदा आपलं पद राखण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यासाठी आपल्याला विरोध करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी छळछावण्याही उभारल्या आहेत, असं बुरुंडीच्या गुप्तचर विभागाच्या माजी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

2015मध्ये एनकुरुनझिझा यांच्या विरोधात राजधानी बुजुंबुरा इथं रस्त्यांवर आंदोलनं झाली. सरकारनं त्या विरोधात केलेल्या कारवाईत शेकडो लोक मरण पावले.

आता सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांना संपवण्याचं काम अजूनही गुप्तपणे सुरूच आहे.

सरकारने मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याचे आरोप कायम फेटाळलेत. अशा अहवालांवर प्रतिक्रियाही दिली नाही.

आताही ही बातमी तुम्हाला विचलित करू शकते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)