कतार 2022: फुटबॉल वर्ल्डकपसाठी काम करणाऱ्या भारतीय कामगारांचं शोषण?

कतार 2022: फुटबॉल वर्ल्डकपसाठी काम करणाऱ्या भारतीय कामगारांचं शोषण?

2022मध्ये कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या तयारीची लगबग सुरू आहे. कतारच्या लुसैल शहरात उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना रंगणार आहे. या शहरात नवीन स्टेडियमचं बांधकाम सुरू आहे.

या बांधकामासाठी भारतासह नेपाळ आणि फिलीपीन्समधून तिथे गेलेल्या 78 कामगारांना कोणत्याही सुविधा पुरवल्या नसल्याचं अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने एका अहवालात म्हटलं आहे.

मर्क्युरी मेना या कंपनीच्या माध्यमातून हे कामगार तिथे गेले आहेत. या कामगारांचे प्रत्येकी 1 लाख 40 हजार रुपये थकीत आहेत, असंही अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)