INS विक्रांत : भारतीय नौदल अधिक भक्कम करणार ही आधुनिक युद्धनौका

INS विक्रांत : भारतीय नौदल अधिक भक्कम करणार ही आधुनिक युद्धनौका

भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी बनावटीची INS विक्रांत ही युद्धनौका कोची येथे बांधली जात आहे. बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी नौदलाच्या गोदीत जाऊन या नौकेचं अंतरंग मांडलं आहे.

या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी पुढल्या वर्षीपर्यंत पूर्ण होऊन तिच्या सागरी चाचण्या सुरू होणार आहेत. हिंदी महासागरात सुरू असलेल्या चीन, अमेरिका आणि भारत यांच्या स्पर्धेत भारताचं पारडं या नौकेमुळे जड होणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)