मुलाच्या अखेरच्या मिठीसाठी जेव्हा अमेरिकेने दिला या मायेला व्हिसा

मुलाच्या अखेरच्या मिठीसाठी जेव्हा अमेरिकेने दिला या मायेला व्हिसा

मूळ येमेनच्या शायमा शेख जेव्हा इजिप्तहून कॅलिफोर्निया शहरात पोहोचल्या तेव्हा स्वागतासाठी हजारो लोक जमले होते. पण ही भेट त्यांच्यासाठी काही आनंदाचं कारण नव्हती.

शायमा यांच्या मुलाला मेंदूचा एक आजार आहे, ज्यामुळे तो मृत्यूशय्येवर आहे. त्यामुळे त्याला एकदा शेवटचं भेटण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.

अमेरिकेने प्रवेशबंदीचा निर्बंध लादलेल्या देशांपैकी एक येमेन आहे. त्यामुळे शायमा आपल्या मुलाला अखेरचं भेटू शकत नव्हत्या.

अखेर शायमा यांच्या समर्थनार्थ अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लोक गोळा झाले आणि अखेर अमेरिकेने त्यांना व्हिसा देऊ केला. त्या आता आपल्या मुलाला एकदा शेवटचं भेटणार.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)