सावधान! अॅप डाऊनलोड करताना मोबाईल हॅक होऊ शकतो - व्हीडिओ

सावधान! अॅप डाऊनलोड करताना मोबाईल हॅक होऊ शकतो - व्हीडिओ

पाकिस्तानमधले हॅकर्स तिथल्या वापरकर्त्यांच्या मोबाईलमधल्या अॅपद्वारे त्यांचा डेटा हॅक करत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

इंटरनेटवर आपली माहिती सुरक्षित आहे की नाही, याबद्दल आपण सतत जागरूक असतो. सीमेपलीकडे पाकिस्तानातही ही काळजी असते.

मात्र, इथले हॅकर्स फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या प्रसिद्ध अॅप्ससोबत त्यांच्या अॅपची लिंक जोडून ती अॅप्स वापरणाऱ्या पाकिस्तानी लोकांची माहिती काढून घेत आहेत. त्यामुळे केवळ बँकेच्या खात्याचीच नव्हे तर मोबाईलकर्त्याचं बोलणं, SMS, ते पाहत असलेल्या वेबसाईट्स ही सगळी माहिती हॅकरकडे जाते.

यामुळे मोबाईल अॅप डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगायला हवी. तसंच, अॅपला विविध परवानग्या देताना त्या देणं आवश्यक आहे का याची माहितीही घ्यायला हवी.

पाकिस्तानातल्या एका एथिकल हॅकरनं याबद्दल बीबीसीचे पाकिस्तानातले प्रतिनिधी उमरदराज यांना या काही खास गोष्टी सांगितल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)