आसाम डबलडेकर पुलाची किमया न्यारी - रेल्वे आणि रोड एकाच पुलावर - व्हीडिओ

आसाम डबलडेकर पुलाची किमया न्यारी - रेल्वे आणि रोड एकाच पुलावर - व्हीडिओ

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर एक मोठा डबलडेकर पूल उभारण्यात आला आहे. 4.94 किलोमीटर लांबीच्या या पुलासाठी 5,920 कोटी रुपये खर्च आला आहे.

रोड आणि रेल्वे अशी दुहेरी वाहतूक करणारा हा बोगीबील ब्रिज देशातला सर्वांत लांब डबलडेकर पूल असणार आहे.

1997 मध्ये तत्कालीन पंतप्रधान H. D. देवेगौडा यांच्या हस्ते या पुलासाठी कोनशिला समारंभ आयोजित करण्यात आला होता.

2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या पुलाच्या कामाला लाल कंदील दाखवला होता. आणि अखेर आज त्यांच्या 94व्या जन्मदिनी या पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

आणखी काय आहे या पुलाचं वैशिष्ट्य? पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)