काश्मीर : सुरक्षा दलांच्या छर्ऱ्यांमुळे दीड वर्षांच्या हिबाने गमावला डोळा
काश्मीर : सुरक्षा दलांच्या छर्ऱ्यांमुळे दीड वर्षांच्या हिबाने गमावला डोळा
काश्मीर खोऱ्यात निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये नेहमी चकमकी होतात. सुरक्षा दलांवर दगडफेक होते आणि मग जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दल अश्रुधुराचा वापर करतं.
याच जोडीला सुरक्षा दल छर्ऱ्यांच्या बंदुकाही वापरतात. 2010पासून वापरात असलेल्या या बंदुकांमुळे 2016पासून तब्बल सहा हजार नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी 782 जणांच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे.
यापैकीच एक म्हणजे नोव्हेंबर महिन्यात डोळ्याला दुखापत झालेली हिबा नावाची 20 महिन्यांची चिमुरडी. छर्रा लागल्याने दुखापत झालेली हिबा ही काश्मीरमधली सर्वांत लहान मुलगी आहे.
व्हीडिओ - आमीर पीरजादा
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)