मेघालय : कोळसा खाणीत अडकलेल्या 15 मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरूच

मेघालय : कोळसा खाणीत अडकलेल्या 15 मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरूच

मेघालयातल्या बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कोळसा खाणीत 15 मजूर अडकले आहेत. 13 दिवसांनंतरही बचाव पथकांना त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

मेघालयात सुमारे 65 कोटी टन एवढा प्रचंड कोळश्याचा साठा आहे. पण 2014 पासून इथल्या खाण उद्योगावर कोर्टाने बंदी घातली आहे. तरीही इथं बेकायदेशीरपणे कोळश्याच्या खाणी चालवल्या जातात.

इथल्या कामगारांना कोणत्याही सुविधा किंवा त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचं बीबीसीच्या निदर्शनास आलं.

बीबीसी प्रतिनिधी देविना गुप्ता यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)