ही 11 वर्षांची मुलगी बॉक्सिंग खेळून स्वतःच्या कुटुंबाला पोसते

ही 11 वर्षांची मुलगी बॉक्सिंग खेळून स्वतःच्या कुटुंबाला पोसते

11 वर्षीय मिन्शाया सिमवोंग ही बॉक्सिंगपटू आहे. ती थायलंडमध्ये राहते.

ती वयाच्या 8व्या वर्षापासून बॉक्सिंग करत आहे आणि तिनं आजवर 40 सामने खेळले आहेत.

नुकतंच 13 वर्षीय एका मुलीचा सामना खेळताना मृत्यू झाल्यानं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

थायलंडमधल्या अनेक गरीब कुटुंबीयांसाठी बॉक्सिंग हा उत्पन्नाचा स्रोत आहे.

"हा एकप्रकारचा रोजगार असून मी माझ्या आईसाठी पैसे कमावत आहे," असं मिन्शाया सांगते.

याच पैशांतून ती शाळेची फीसुद्धा भरते. बॉक्सिंग खेळण्याचा तिला अभिमान वाटतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)