भीमा कोरेगाव : 'माझं जे नुकसान झालंय ते पैशाने भरून निघणार नाही' - पाहा व्हीडिओ

रमा अशोक आठवले यांचं भीमा कोरेगाव हिंसाचारादरम्यान सणसवाडीतलं घर- दुकान जाळण्यात आलं. एक वर्षांनंतरही आपलं कुटुंब या धक्क्यातून सावरलेलं नाही, असं त्या सांगतात.

"खूप भयानक परिस्थिती होती. आम्ही यातून आता जिवंत वाचणार नाही, असं वाटतं होतं. आमच्या दोघांपेक्षा मुलांची काळजी वाटत होती," असं त्या सांगतात.

"भयानक परिस्थिती होती. जिकडे तिकडे दगडफेक, टायरांचे फुटण्याचे आवाज, किंकाळ्या, लेकरंबाळं ओरडत होती. पळापळ सुरू होती. सिनेमात दाखवतात त्यापेक्षा भयानक परिस्थिती आम्ही डोळ्यांनी पाहिली," रमा आठवून सांगतात.

या हल्ल्यातून रमा, त्यांचे पती आणि तीन मुलं कसेबसे बचावले.

रमा 20 वर्षांपासून त्या गावात राहात होत्या. मात्र आता पुन्हा तिथे जाण्याची त्यांची इच्छा नाही.

या घटनेनंतर आठवले कुटुंबीयांचं पुण्यातील कसबा पेठेत पुनर्वसन करण्यात आलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)