मेंदुवर सर्जरी होत असताना कुणी गिटार वाजवंल का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मेंदूवर सर्जरी होत असताना कुणी गिटार वाजवंल का? - व्हीडिओ

मेंदूवर एक नाजूक सर्जरी चालू असताना दक्षिण आफ्रिकेतले मुसा मांझिनी गिटार वाजवत होते!

मेंदूतला ट्युमर काढताना मेंदूचं काम बंद पडू नये, म्हणून म्युझिशियन असलेले मुसा मांझिनी यांना जागंच ठेवलं होतं.

भूल देऊन मुसा यांच्या डोक्यात छिद्र केलं होतं. पण ट्युमरवर काम सुरू झालं तेव्हा त्यांना जागं करण्यात आलं.

ही सर्जरी एकूण 6 तास चालली. सर्जरीनंतरही हातांची हालचाल चालू राहावी, यासाठी ते गिटार वाजवत होते.

90% ट्युमर काढला गेला, पण तो परत वाढू शकतो, असं डॉक्टर सागंतात.

सर्जरीच्या वेळी माझ्या डोक्यात आगीच्या ठिणग्या उडत असल्यासारखं वाटत होतं, असं मुसा मांझिनी सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)