व्हेनेझुएलामध्ये एकाच वेळी दोन नेते राष्ट्राध्यक्ष?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हेनेझुएलामध्ये एकाच वेळी दोन नेते राष्ट्राध्यक्ष?

व्हेनेझुएलामध्ये गेले अनेक महिने आर्थिक अस्थैर्य आणि राजकीय उलथापालथ सुरू आहे.

अशातच विरोधी पक्षनेते खुआन ग्वाइडो यांनी मादुरो सरकारला आव्हान देत सरळ हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

अमेरिका, कॅनडासह सात लॅटिन अमेरिकी देशांनी त्यांना मान्यता दिली आहे. पण मादुरो यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावत त्यांच्या डिप्लोमॅट्सना शुक्रवारपर्यंत देश सोडून जाण्याचा इशारा दिला आहे.

सरकारच्या सर्वोच्च पातळीवर सुरू असलेल्या या नाट्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या देशात आणखी अस्थिरता निर्माण झाली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)