राज्यघटना संवर्धनासाठी ते सादर करतात पथनाट्य - व्हीडिओ

राज्यघटना संवर्धनासाठी ते सादर करतात पथनाट्य - व्हीडिओ

भारतीय नागरिकांमध्ये राज्यघटनेबद्दलची जनजागृती व्हावी म्हणून अनेकदा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र मुंबईतील काही भागांमध्ये यासाठीच पथनाट्य सादर केली जातात.

"आपला देश ज्या एका गोष्टीवर चालत आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना किंवा संविधान. आज कुणालाही त्याच्याबद्दल काही अलर्टनेस नाही किंवा काही वाटत नाही. कुणी जागृत नाहीये. मग मी विचार केला की एका पथनाट्याद्वारे आपण काही करावं. पथनाट्यातून थेट लोकांमध्ये जाऊन आपण तो संदेश पोहोचवू शकतो. आणि मग मी हे नाटक लिहायला सुरुवात केली," असं या पथनाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक श्रीकांत मोरे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)