कुटुंब नियोजनाअभावी पाकिस्तानमध्ये उभं राहतंय हे सामाजिक संकट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाकिस्तानात अभाव कुटुंबनियोजनाचा; उभं राहतंय सामाजिक संकट - व्हीडिओ

पाकिस्तानमध्ये दरवर्षी वीस लाखांहून जास्त गर्भपात होतात. याचं मुख्य कारण आहे कुटुंब नियोजनाचा अभाव. त्यासाठीच्या शस्त्रक्रिया किंवा साधनं यांची माहितीही उपलब्ध नसते.

आणि काहीवेळा घरून त्याला विरोधही होतो. याचा परिणाम असा होतोय की पाकिस्तानात लोकसंख्येचा विस्फोट होतोय.. त्यामुळे पाकिस्तानात गरिबीही वाढत आहे.

खरं तर पाकिस्तानमध्ये गर्भपाताला कायद्याने बंदी आहे. डॉक्टरची परवानगी नसेल तर गर्भपात शक्य नाही, तरीही पाकिस्तानात गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते.

आणि म्हणूनच आता संयुक्त राष्ट्रसंघानेही या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)