यूट्युबर लाखो लोक का सर्च करताहेत कुजबुजण्याचे, खाण्याचे आवाज?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

यूट्युबर लाखो लोक का सर्च करतायत कुजबुजण्याचे, खाण्याचे आवाज?

कानाशी सतत कोणीतरी कुजबुजल्याचा, थर्माकोल खरवडण्याचा किंवा खाण्याचा मचमच आवाज केला की तुम्हाला कसंतरी होतं? पण सध्या असे आवाज अनेकांना रिलॅक्स करणारे ठरत आहेत. या आवाजामुळं गुदगुल्या झाल्यासारखी भावना निर्माण होते, शांत झोप लागते असं लोक सांगत आहेत. हे ऐकताना काहीसं विचित्र वाटेल, पण ASMR - an autonomous sensory meridian response मुळं हे होत आहे. कुजबूजण्याच्या, चुरा करण्याच्या आवाजामुळं ही संवेदना जागृत होते. त्यामुळं मन शांत व्हायला मदत होते. कदाचित त्यामुळेच युट्यूबवर केवळ असे आवाज ऐकवणारे लाखो व्हीडिओ उपलब्ध आहेत. हा सध्याचा एक मोठा सर्च ट्रेंड बनलाय. आता तुम्हालाही या आवाजामुळं असंच काही वाटतंय का, हे व्हीडिओ पाहूनच ठरवा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)