Polar vortex : अमेरिकेतली शहरं अंटार्क्टिकाहून जास्त गोठली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Polar vortex :'अमेरिकेत अंटार्क्टिकाहून जास्त थंडी पडली'

पोलर व्हर्टेक्समुळं अमेरिकेतला काही भाग गोठला आहे. शिकागो हे अंटार्क्टिकापेक्षाही जास्त गारठल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

तापमान इतकं घटल आहे की तुम्ही 10 मिनिटं जरी घराबाहेर गेलात तरी हिमदंश होऊ शकतो.

लोकांना खोल श्वास घेण्यास आणि घराबाहेर बोलण्यास मनाई आहे. दोन्ही धृवांपासून 30 किमी वरच्या भागात कायम असं वातावरण असतं. सध्या काही शहरांमध्ये आणीबाणी जाहीर झाली आहे.

हजाराहून अधिक विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान पोलर व्हर्टेक्सची स्थिती अधिक काळ राहणार नाही.

पुढच्या आठवड्यात शिकागोचं तापमान +10 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढेल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)