गे असल्यामुळं फुटबॉलपटूच्या वाट्याला आली अवहेलना
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आफ्रिकेतला एकमेव उघडपणे गे असलेला फुटबॉलपटू आहे फुटी लेकोलेन - व्हीडिओ

आपण गे आहोत, हे उघडपणे मान्य केल्यानंतर आफ्रिकन फुटबॉलपटू पुटी लेकोलेन याला अवहेलनेला तोंड द्यावं लागलं. अनेक संघांनी त्याच्यासाठी दरवाजे बंद केले.

सहकाऱ्यांनीही त्याच्यावर टीका केली. मात्र खचून न जाता त्यानं स्वतःला आहे तसं स्वीकारलं. आज तो टोरनॅडो एफसी या फुटबॉल संघाचा गोलकीपर आहे.

जगाला काय वाटेल याचा विचार न करता स्वतःचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे, हाच संदेश तो इतरांनाही देत आहे. माझ्या गुणांपेक्षा माझ्या लैंगिकतेला प्राधान्य दिलं गेलं, असं तो म्हणतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)