दारू पीनेसे डीएनए खराब होता है...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दारूमुळे कसा बदलतो तुमचा डीएनए ? - पाहा व्हीडिओ

दारू पीनेसे लिव्हर खराब होता है...हा संवाद विनोदी म्हणून गाजला असला तरी मद्यपानाचे आरोग्यावरील दुष्परिणाम हा गांभीर्यानं पाहण्याचा विषय आहे.

दारूचं व्यसन लागलेल्या माणसाच्या शरीरात नेमके कोणते बदल होतात, यावर अमेरिकेच्या रॉटगेज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक संशोधन केलं. या संशोधनातील निष्कर्ष Alcoholism: Clinical & Experimental Research या शोधनिबंधात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संशोधनातील महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे दारूमुळे थेट डीएनवरच दुष्परिणाम होतो.

डीएनवर झालेल्या दुष्परिणामामुळं शरीर पुन्हा पुन्हा दारूची मागणी करत राहतं. म्हणजेच मद्यपान, त्यामुळं डीएनए खराब होणं आणि त्याचा परिणाम म्हणून सतत दारू प्यावीशी वाटणं, हे दुष्टचक्र सतत सुरू राहतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)